भाजपचे राजुरा विधानसभा इच्छुक उमेदवार भोंगळे बल्लारपूर विधानसभा प्रचार प्रभारी नियुक्त तर खुशाल बोन्डे यांचे देवेंद्र ला साकडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजपचे राजुरा विधानसभा इच्छुक उमेदवार भोंगळे बल्लारपूर विधानसभा प्रचार प्रभारी नियुक्त तर खुशाल बोन्डे यांचे देवेंद्र ला साकडे

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :विधानसभा 2019ची आचारसंहिता लागली असून सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या अंतर्गत तयारीत लागले असून भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणूक प्रचार प्रभारींची निवड ने श्री.डॉ उपेंद्र कोठेकर (भाजपा विदर्भ संघटनमंत्री  ) यांच्या मार्गदर्शनात पक्ष समिती ने केली असून यादी पुढीलप्रमाणे :

1)वरोरा :श्री विजय राऊत

2)चिमूर : श्री हरीश शर्मा
3)ब्रम्हपुरी : श्री संजय गजपुरे
4)बल्लारपूर : श्री देवराव भोंगळे
5)राजुरा : श्री जैन्नुद्दीन जव्हेरी
चंद्रपूर विधानसभा क्षेत्र महानगर अंतर्गत अद्याप राखीव असून येथील प्रभारींचीही निवड लवकरच केली जाईल अशी माहिती आहे.

यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रचार प्रभारी म्हणून नियुक्त झालेले देवराव भोंगळे हे राजुरा विधानसभा उमेदवारी करिता इच्छुक असून त्याबद्दल ची जय्यत तयारी सुरु असताना पक्षाकडून बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या प्रचार प्रभारी पदी निवड झाल्याने अनेक उलट सुलट चर्चाना पेव फुटला आहे.


सोबतच राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले खुशाल बोन्डे यांनी सुद्धा माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या सोबत मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उमेदवारी च्या मागणीकरिता भेट घेतली असून कार्यकर्त्यां मध्ये  चुरस वाढली आहे.