नीलगाईच्या धडकेने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू : कुटुंबाचा एकमेव आधार हरविला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नीलगाईच्या धडकेने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू : कुटुंबाचा एकमेव आधार हरविला

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना 

तालुक्यातील जेवरा येथील शेतकरी युवक अरविंद मडावी (वय 30 वर्ष )शेतांमध्ये पिकाची राखण व्हावी म्हणून दिवसभर शेतात काम करण्यास थांबले असता होते रात्री 9 वाजले मात्र घरी आले नसल्याने घरच्या  व्यक्तीने  शेतात जाऊन चौकशी केली असता शेतात जखमी अवस्थेत असलेला अरविद मडावी यांना वनविभागाच्या नील गाईने धडक दिली असल्याची त्याने सांगितले. 

त्यावेळेस रक्तबंबाळ असलेल्या अरविंद ला गावातील नागरिकांनी त्यांना बैलबंडी वर घरी आणून सदर ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे उपचार करण्यात आला नंतर चंद्रपूर येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान रात्रीला 1:30 वाजता दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अरविंदला दोन मुले पत्नी म्हातारे आई-वडील असल्याने घरचा करताच व्यक्ती गेल्याने संपूर्ण हळहळ व्यक्त होत आहेत मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार  नसल्याने सदर वनविभागाने पंचनामा करून त्या व्यक्तींना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्या कुटुंबीयांकडून केली जात आहेत.

तसेच शासनाच्या योजनांचा त्यांच्या पत्नीला लाभ घ्यावा करिता पत्नीने आपली व्यथा व्यक्त करित आहे घरी परतण्याच्या वेळेवर  युवकांना शेतांमध्ये वन विभागाच्या निघायचे वेळेवर धडक दिली असल्याची तक्रार कोरपना पोलीस स्टेशनला देण्यात आली तसेच वन विभाग कार्यालयाला माहिती कळवली व जेवरा येथील नागरिकांनी व अरविंदच्या नातेवाईकांनी मूर्त व्यक्तींचे प्रेत वनसडी वनविभागाच्या कार्यालयात आणून त्यांच्या विभागाकडून आर्थिक मदत मिळेपर्यंत प्रेत उचलणार नाहीत असा हट्ट धरला.

त्यावेळीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबियांचे मत जाणून घेतले  सदर पंचनामा करून आम्ही शासनाकडे आर्थिक मदत मिळण्याकरिता अहवाल पाठवतो व त्यांना अर्थसहाय्य मिळवून देऊ असे आश्वासन दिले यावेळी कोरपना तालुक्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका अध्यक्ष भाजपा नारायण हिवरकर ,सुनील बावणे, सुरेश मालेकर ,अनिल गोंडे, विजय तेलंग, रसूल पाटील ,प्रदीप मालेकर, रामचंद्र बल्की ,भास्कर जोगी,मंगल आत्राम आदी लोकप्रतिनिधीनी स्थानिक आमदारांनी तसेच या जिल्ह्याच्या वनमंत्र्यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून मूर्त कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.