मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील कोतवालांचे मुंबई येथे अन्नत्याग आंदोलन : कोतवालीचे काम बंद करून वणी शाखेचा पाठिंबा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील कोतवालांचे मुंबई येथे अन्नत्याग आंदोलन : कोतवालीचे काम बंद करून वणी शाखेचा पाठिंबा

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना मार्फत या पूर्वी राज्यशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेत्यानुसार कोतवालांना ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन निचित करुण चतुर्थ श्रेणीचा दर्जा देने व इतर विविध मागण्या शासनाने मान्य करीत मागील आंदोलन शमविले होते  परंतु आजपर्यंत  यापैकी एकही मागणी पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष व इतर कोतवाल पदाधिकारी यांनी आजपासून दी.३/०९/२०१९ ते १७/०९/२०१९ पर्यन्त आझाद मैदान मुंबई येथे अन्यत्यागाचे आंदोलन पुकारले आहे.


सदर मागण्या पूर्ण न झाल्यास दी.१८/०९/२०१९ ला राज्याचे राज्याध्यक्ष व इतर कोतवाल पदाधिकारी मंत्रालय येथे आत्मदहन करतील त्यामुळे आंदोलनाला यशस्वी स्वरुप प्राप्त व्हावे यास्तव आमच्या मागण्या या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा वणी च्या वतीने (यवतमाळ) सर्व कोतवाल व् पदाधिकारी आम्ही कामबंद आंदोलन पुकारत निवेदन सादर केले. 

यावेळेस चंपत उइके, राकेश संकिलवार,उत्तम पाचभाई, नरेंद्र बोढाले,चंद्रभाम देवाळकर,प्रफुल लोडे,महादेव जूनगरी,महादेव गाते,पवन पचारे, संजय कुचनकर,प्रविण बद्रे,गनपत दुर्ग्रे, जगदीश चंदेकार व इतर कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.