ब्रेकिंग : पालकमंत्र्यांच्या वाहनाला बाम्बूच्या ट्रकला घासून अपघात : मुनगंटीवार थोडक्यात बचावले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : पालकमंत्र्यांच्या वाहनाला बाम्बूच्या ट्रकला घासून अपघात : मुनगंटीवार थोडक्यात बचावले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
वित्त, वने नियोजन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गाडीला बल्लारपूर येथील रेल्वे चौकात काही वेळापूर्वी अपघात झाला.


पालकमंत्री आज पासून 3 दिवसीय जिल्हा दौऱ्यावर असून, आज बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाच्या उदघाटनाचा कार्यक्रम आटोपल्यावर मतदारसंघातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या गाड्यांचा ताफा पोंभुर्णा कडे वळला असताना अचानक पेपर मिल कडे जाणाऱ्या बांबू भरलेल्या ट्रक ला मुनगंटीवार बसून असलेली यांची गाडी घासत गेली.

दोन्ही गाडीचालकांच्या प्रसंगवधानाने वेग कमी करत मोठी दुर्घटना टळली. यामध्ये कुणाला कसलीही इजा झाली नाही.

घटनास्थळी वाहतूक थांबून बघ्यांची चिक्कार गर्दी जमली असता अपघात झाल्यानंतर स्वतः सुधीर भाऊंनी गाडीखाली उतरून कुणाला काही लागलं तर नाही याबद्दल विचारणा केली व नंतर दुसऱ्या वाहनाने पोंभुर्णा येथील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले.