चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्व व मान्यते नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.


बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपक गोतमरे यांची बदली पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथे,

चिमूर चे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची पोलीस कल्याण विभाग चंद्रपूर येथे,

भद्रावती येथील पोलीस निरीक्षक हृदयनाथ यादव यांची वाहतूक नियंत्रण कक्ष चंद्रपूर,

गड़चांदूरचे पोलिस निरीक्षक विलास चव्हाण यांची नियंत्रण कक्ष चन्द्रपुर,

कोरपण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांची जिल्हा विशेष शाखा चन्द्रपुर,

जिल्हा विशेष शाखेतिल गोपाल भारती यांची पोलिस स्टेशन गड़चांदुर येथे,

सुनिलसिंग पवार यांची पोलिस कल्याण विभागतुंन भद्रावती येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली,

भिसीचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यांची चिमूर पोलिस स्टेशन येथे,

पोलिस नियंत्रक कक्षातिल अरुण गुरनुले यांची कोरपना येथे पोलिस निरीक्षक म्हणून बदली,

रामनगर चन्द्रपुर येथील पोलिस निरीक्षक नाइकवाड यांची भिसी पोलिस स्टेशन,

मूल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सतीश सोनेकर यांची नागभीड़ येथे, करण्यात आली आहे. 

त्याच बरोबर 20 उपपोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांची उचल बागड़ी करण्यात आली आहे.