शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :संतोष इंद्राळे जिवती-  


राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी,यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
          
शासनाने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने दिले आहेत,मात्र मुख्यालयी राहण्याच्या शासकीय आदेशाला कर्मचार्यांनी केराची टोपली दाखवून अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.गावाच्या विकासासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते,शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक, शिक्षक,तलाठी,डॉक्टर आदी कर्मचारी असतात.त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे,शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालय राहून सेवा दिल्यास गावाचा विकास झपाट्याने होते.



शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयात राहण्यासाठी अट असते त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात,तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्ता सुद्धा दिला जातो परंतु या आदेशाला न जुमानता गरजे नुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जी प्रमाणे शासकीय कर्मचारी वागत असल्याचे चित्र सध्या जिवती तालुक्यात पाहायला मिळत आहे.अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश कर्मचारी गावात ओळखीच्या घरी तसेच आपले निकटचे संबंध असलेल्या घरी राहतो म्हणून रहिवाशी दाखला घेऊन घरभाडे उचलत आहेत. 



सदर कर्मचारी स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाकरिता जिल्याच्या ठिकाणी वास्तव करीत आहेत,जिल्याच्या ठिकाणाहून ये- जा करीत असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे,याला शासकीय प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. बरचसे कर्मचारी कामाचा भहना सांगून दांड्या मारीत असल्याचेही दिसून येत आहे, जिवती तालुका नक्षलग्रस्त भाग व तसेच सोयीसुविधेचा अभाव असल्याचे कारण सांगून अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यास कुचराई करीत आहेत,या समस्सेची प्रशासनाने दखल घेऊन गुप्त दौरे कार्यक्रम राबवून मुख्यलयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.