राजेश्वर सहारे यांच्या हाथी दुसऱ्यांदा श्रमिक एल्गार ची धुरा : सर्वानुमते नव्या अध्यक्ष्याची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजेश्वर सहारे यांच्या हाथी दुसऱ्यांदा श्रमिक एल्गार ची धुरा : सर्वानुमते नव्या अध्यक्ष्याची निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

श्रमिक एल्गारचे नवे अध्यक्ष म्हणुन राजेश्वर सहारे यांची निवड करण्यात आली. श्रमिक एल्गारच्या चितेगाव येथे संपन्न झालेल्या केंद्रीय कमेटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. 


अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी निवडणुक लढण्यासाठी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे जागेवर ही निवड करण्यात आली. श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी राजेश्वर सहारे यांचे नाव सुचविले तर शशिकांत बदकमवार व पारोमिता गोस्वामी यांनी अनुमोदन दिले. यावेळी श्रमिक एल्गारने अॅड. पारोमिता गोस्वामी यांना निवडणुकीत पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रम्हपुरी व्यतीरीक्त इतर क्षेत्रात श्रमिक एल्गार स्वतंत्र निर्णय घेईल असाही निर्णय घेण्यात आला. 


अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे प्रचारासाठी श्रमिक एल्गारच्या सभासदाकडुन अनामत रक्कमभरण्यासाठी 25 हजार रुपये गोळा करण्याचे ठरविण्यात आले. 

राजेश्वर सहारे हे 2010 ते 2015 पर्यंत श्रमिक एल्गारचे अध्यक्ष होते व त्यांचे कार्यकाळातच चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी झाली हे विषेश

बैठकीत श्रमिक एल्गारचे कोषाध्यक्ष अनिल मडावी, महासचिव घनशाम मेश्राम, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष मोतीराम विधाते, तालुका उपाध्यक्ष घनशाम लेंजे, सावली तालुका अध्यक्ष रामचंद्र हुल्के, उपाध्यक्ष यात्रीका कुमरे, रवि नैताम, सचिव शांताराम आदे, वंदना मांदाडे, पुष्पा नेवारे, मंगला आवारी, सुष्मा कुसराम, उपस्थित होते.