जिल्ह्यात चितळ्यांच्या शिकारीत वाढ : धाबा वनपरिसरात चितळ शिकारी जाळ्यात -मांस व हत्यारासहित रंगेहात अटक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात चितळ्यांच्या शिकारीत वाढ : धाबा वनपरिसरात चितळ शिकारी जाळ्यात -मांस व हत्यारासहित रंगेहात अटक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी -

गोंड़पिपरी  तालुक्यातिल धाबा वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करून, मांस विक्री करण्याच्या तयारीत असताना वन विभागाने मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली. 


धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या धामनपेठ बिटात काल दिनांक 12सप्टेंबर रोजी चितळाची शिकार झाली असल्याची माहिती मिळताच धामनपेठ बीटातील वटराणा गावालगत आरोपीचा शोध घेत तात्काळ  सापळा रचत वन विभागाने मुख्य आरोपी रवि गेडाम (वय-50 ) रा. वटराना याला चितळाच्या मासं व हत्यारा सह अटक केली.

सदर कारवाई धाबा वनपरिक्षेत्राचे आर एफ ओ राउतकर यांच्या मार्गदर्शनात केलि असून आरोपी रवि गेडाम यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई सुरु आहे.या शिकारीत पुन्हा आरोपिंचा शोध वनविभाग घेत असून पुढील तपास व अटकेची कारवाई सुरु आहे.