अखेर त्या आदिवासी महिलेचा छळ करणाऱ्या दीपक साहू वर विनयभंग व अट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर त्या आदिवासी महिलेचा छळ करणाऱ्या दीपक साहू वर विनयभंग व अट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - कोरपना ( 10 सप्टेंबर 2019)    
दोन दिवसांपूर्वी उपरवाही येथील नाहक बदनामी व मनस्तापाखातीर आत्महत्या करणाऱ्या स्वाभिमानी सूर्यभान कोडापे यांच्या पत्नी लता कोडापे यांच्याशी घरकाम करायला जात गेले असता अभद्र व्यवहार करून, तिच्यावर खोटा चोरीचा आळ लाऊन प्रचंड मानसिक दबाव निर्माण केला. 


तिला नाहक मानसिक त्रास व अमानवीय पद्धतीने मारहाण करणाऱ्या अंबुजा सिमेंट उद्योगातील, मराठा सिमेंट वर्क उपरवाही येथे कार्यरत दीपक साहू यांच्या विरुद्ध शक्ती स्वामींनी महिला मंच च्या अध्यक्ष गोमती पाचभाई  व  आदीवासी सघर्ष कृती समीती चे मा.भारतभाऊ आत्राम, आदिवासी सेवक मा.वाघुजी गेडाम ,जेष्टसमाज सेवक मा.डाँ.मधुकरजी कोटनाके ,मा.ऊध्दवजी कुडसगे,मा.दिपक मडावी ,अभिलाश परचाके,क्रिष्णा गेडाम,नितीन सिडाम ,महिपाल मडावी ,नलिन कुडमेथे, सतोश मडावी,संतोष  कुडमेथे यांनी धीर देत आपली संपूर्ण आपबिती व झालेला अन्याय न सहन करता  अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिल्यानंतर आज दिनांक 10 सप्टेंबर 2019रोजी   भादंवि 354(अ) व अनुसुचतीत जाती व जमाती अत्याचार अधिनियम प्रतिबंध 1989(अट्रासिटी ऍक्ट ) अंतर्गत गडचांदूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरु असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

----------------------------------------------------------
उपरवाही येथील आदिवासी महिलेवर झालेला अन्याय सहन करनार नाही-शक्ती स्वामींनी महिला मंच, चंद्रपूर

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -(8 सप्टेंबर 2019)

उपरवाही तह कोरपना या गावातील सुर्यभान रामा कोड़ापे हे त्याची पत्नी लता,एक मुलगा,एक मुलगी हे गरिब कुटुंब मोलमजुरी  करुन स्वाभिमानानी  जिवन जगत होते.त्यांची पत्नी लता आपल्या  कुटुंबाला हातभार  होण्याकरिता अंबुजा सिमेंट कंपनीतील दीपक  शाहू यांच्या  घरी घरकाम  करन्याकरीता  जात  होती. शाहु यांनी लता कोडापे हिने घरकाम करीत असताना  पैसे चोरले असा  आरोप लावुन तिला गडचांदूर पोलिस स्टेशन ला तीन दिवसाची कोठडी होऊन पि.सी.आर.  घेण्यात आला.त्या लता ने चोरी केली नाही.असे सांगितले. व  ती दि.7/9/19 ला  घरी आली. त्यात तिचा नवरा सूर्यभान कोडापे यांना  बेदम मारहाण केली.असे सांगण्यात  येत आहे.ह्या सगळ्या प्रकारात  लता च्या नव-याने सायं.लतासोबत बोलताना म्हणाले  की आपण मजुरी करुन पोट भरत आहो.आजपर्यंत आपल्यावर  कोणीही  कोणातही आरोप केला नाही पण साहुने आपल्यावर  चोरीच  खोटा  आरोप लावुन  तुला पोलिस स्टेशन मध्ये डांबले व मलाही बोलावून  मारहाण केली .हे आघात सहन करने शक्य झाले नाही व माझ्या  नव-यानी विष प्राशान करुन जिवन यात्रा संपविली. 

दि.8/9/19 ला सकाळी  माझ्या नातेवाईकानी त्याना गडचांदूर  दवाखान्यात नेले असता  तिथुन त्याना चंद्रपुर येथे  हलवण्यात आले व तिथे  तो  मृत पावला.पण पोलिसांनी व दवाखान्यातील  डाक्टर ने  नातेवाहिका कडुन पोस्ट मार्टम नाही करत असे लिहुन घेतले व मृतकाला उपरवाही राहत्या घरी पाठवाले. 
    
हे घटना  कळताच शक्ती स्वामींनी महिला मंच चंद्रपूर च्या अध्यक्ष  गोमती पाचभाई,  अंबुजा सिमेंट येथील गायत्री परिवाराच्या मीनाक्षी शेखावत व आदिवासी कृती समिती चंद्रपूर चे महासचिव भरत आत्राम व जिल्हा उपाध्यक्ष महिपाल मडावी घटनास्थळी गेले .त्या  मृतकाची  सखोल चौकशी व्हावी  या करिता तेथील गावातील उपसरपंच याना  सोबत घेउन  त्या  मृतकाची  पोस्ट मार्टम  करण्याकरिता  गडचांदूर सरकारी  दवाखान्यात  आनले.

तिथे  एस डी पी ओ  यामावार साहेब,थानेदार भारती साहेब यानी  आत्महत्या ग्रस्त मृतकाला शासनाकडून 2 लाखाची मदत मिळवून  देण्याचे आश्वासन घेऊन मृतदेह उचलण्यात आला. 

या संपुर्ण प्रकराची चौकशी करुन गुन्हेगारांना शिक्षा  द्यावी तसेच या कुटुंबावर त्या साहू मुळे आघात  झाला आहे यामुळे त्याला अनु.जमाती कायदा अट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा  दाखल करुन अटक करवी अशी  मागणी गोमती पाचभाई व भरत आत्राम यांनी केली असुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.