शरद पवारांवर शिखर बँक गैरव्यवहारात गुन्हा दाखल प्रकरणी चंद्रपुरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची निदर्शने - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शरद पवारांवर शिखर बँक गैरव्यवहारात गुन्हा दाखल प्रकरणी चंद्रपुरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची निदर्शने

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने राज्य शिखर बँकेच्या कर्ज वाटप प्रकरणी गुन्हा दाखल केला.याच्या निषेधार्थ चंद्रपुर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात प्रियदर्शनी चौक येथे भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

शरद पवार साहेबांना राज्यव्यापी दाै-याला मिळत असलेल्या अभुतपुर्व प़तिसादा मुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवुन राजकिय हेतुने प्रेरित हाेऊन सूडबुद्धीचं राजकारण करून ई.डी.मार्फत कारवाईचा बडगा ऊभारणे म्हणजे लाेकशाहीचा खुन आहे. ह्या दडपशाही धाेरणाचा जाहीर निषेध करून शरद पवार यांच्या विरुद्ध केलेला गुन्हा मागे घ्या अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष दिपकभाऊ जयस्वाल महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हाउपाध्यक्ष वंदना आवळे जिल्हासचिव शोभा घरडे,जिल्हासरचिटणीस दयाबाई गोवर्धन,सरस्वती गावंडे,ममता गोजे,नीलिमा नरवडे,सुचिता बोरकर,लता जांभुलकर,ज्योती मस्के, स्वीता रामटेके,व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.