ग्रामसेवकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला यश : मागण्या मंजूर करण्याचे पंकजा मुंडे यांचे आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ग्रामसेवकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला यश : मागण्या मंजूर करण्याचे पंकजा मुंडे यांचे आदेश

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

काल दि.१४ सप्टेंबर रोजी पंकजा मुंडे (पालवे) यांचे सोबत असीम गुप्ता प्रधान सचिव यांचे उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ ची रॉयलस्टोन बंगला येथे भेट व संघटनेच्या आंदोलनाच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली यात ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या मंजूर करण्याचे व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देण्यात आले.
या चर्चेत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी  दोन्ही पदे रदद्  करून  पंचायत विकास अधीकारी हे एकच पद तत्वतः मान्यता, ग्रासे संवर्गास प्रवासभत्ता रु.१५०० फाईल वित्त विभाग कडुन कैबीनेट करीता पाठवणेत आली लवकरच आदेश काढणे बाबत पंकजा मुंडे यांनी विभागास सुचना दिल्या. 

ग्रामसेवकासाठीची शैक्षणीक अहर्ता पदवीधर करूण त्वरीत आदेश काढणेत येणार, ४ जानेवारी २०१७ चे  अनियमीतता बाबत फौजदारी गुन्हा दाखल करणेचा बदल करण्यात येणार सदरची फाईल तात्काळ निकाली काढणे बाबत पंकजा मुंडे सांगीतले. 

अतीरिक्त कामे कमी करणे विषयावर सविस्तर चर्चा होऊन गठीत समिती शिफारशी नुसार योग्य कार्यवाही करणे बाबत ताईकडुन आदेश देण्यात आले.. 
     
सदर बैठकीला राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम, कार्याध्यक्ष गळगुंडे तात्या, मानद अध्यक्ष अनिल कुंभार, उपाध्यक्ष सुचित घरत, संयुक्त सचिव सचिन वाटकर, प्रसिद्धी प्रमुख बापु अहीरे, संपर्क प्रमुख उदय शेळके विभागीय सचिव कमलेश बिसेन, विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, नारायण बडे, शिवराम मोरे सहसचिव कोकण भालके मॅडम, नागपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धारपूरे, नांदेड अध्यक्ष एन.डी.कदम, परभणी अध्यक्ष भोसले, हरीभाऊ लोहे, दिपक दवंडे, रमेश मुळे, पूंडलीक पाटील, उबाळे अन्ना, पुणे अध्यक्ष वाव्हलजी सचिव संदीप ठेवल, जिवन कोल्हे, सुधाकर बुलकुंदे, अशोक काळे, बुलढाणा तुकाराम सदावर्ते, विष्णू इंगळे, गोविंद गीते, बीड शिवाजी जाधव, भाऊसाहेब मिसाळ, शहाजी नरसाळे, बागायतकर  सरचिटणीस सिंधुदुर्ग शेळके आना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.