संत श्री जगनाडे महाराज चौक नामकरण सोहळा समस्त तेली बांधवांच्या उपस्थित संपन्न. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संत श्री जगनाडे महाराज चौक नामकरण सोहळा समस्त तेली बांधवांच्या उपस्थित संपन्न.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :हिंदुस्तान लालपेठ काँलरी प्रभागातील बाबूपेठ परिसरातील  पागल चौकाचे नाव बदलवून संत श्री जगनाडे महाराज चौक  करण्यात यावे अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी  झोन सभापती सौ. कल्पना बगूलकर यांनी केली होती. 


झोन सभापती सौ. कल्पना बगूलकर यांनी  चंद्रपूर महानगरपालिकेतील आमसभेत हा विषय ठेवून सर्वानुमते मंजूर करून घेतला. त्याचा नामकरण सोहळा आज  दिनांक 18/09/2019 ला दूपारी 1.30 वा. पार पडला. 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तैलिक एल्गार संघटनेच्या  महिला जिल्हाध्यक्षा सौ. चंदा इटनकर उपस्थित होत्या.


या शुभ प्रसंगी वार्डातील श्री बंडुजी खनके, देवराव वैरागडे, येवले काकाजी, सौ. अर्चना कामडे, मंजुषा पोटदुखे, रुपाली आंबटकर, रेणूका आंबटकर,अल्का खनके, मंजुषा वैरागडे, किरण शेंडे, संध्या दांडेकर, धोडरे काकू,  माया अमृतकर, वंदना खनके, संध्या बोबाटे तसेच तेली समाज बांधव व चौकातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.