हिरकणी नवउद्योजक स्पर्धेत घाटकुळच्या संत गोरोबा महिला बचत गटाच्या मातीकामाची दखल : जिल्हास्तरीय अडीच लाखाचे बक्षीस - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिरकणी नवउद्योजक स्पर्धेत घाटकुळच्या संत गोरोबा महिला बचत गटाच्या मातीकामाची दखल : जिल्हास्तरीय अडीच लाखाचे बक्षीस

Share This
खबरकट्टा / पोंभुर्णा : अविनाश पोईनकर 

               
बचत गट महिलांच्या नाविण्यपुर्ण संकल्पनांना प्रोत्साहन मिळावे व लघुउद्योगातून महिला सक्षमीकरण घडावे या उद्देशाने 'हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची' हि नाविण्यपुर्ण स्पर्धा घेण्यात आली. यात महिला आर्थिक विकास महामंडळ संलग्नित घाटकुळ येथील संत गोरोबा स्वावलंबी महिला बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेवून तालुका स्तरावर ५० हजार व जिल्हास्तरावर दोन लाखाचा पुरस्कार मिळवला. 'मातीकामापासून विविध वस्तू बनवणे' या संकल्पना सादरीकणाची निवड करण्यात आली.

नुकतेच चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात वित्त, नियोजन, वने तथा पालकमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार, सुपर कॅम्प्यूटरचे जनक, जेष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांच्या हस्ते संत गोरोबा बचत गटाच्या महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 


यात विजूबाई पातर, नंदा खोबरे, वंदना तेलंगे, आशा खोबरे, लता खोबरे, कल्पना खोबरे, प्रतिमा पातर, रेश्मा खोबरे, कल्पना मेदाळे, कुंतकला खोबरे, चंद्रकला तेलंगे, शोभा देवकुंडलवार, पंचफुला शिंदे, सुमन कोंडावार, पार्बता खोबरे, मंजूळा तेलंगे या महिलांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले उपस्थित होते. 

सदर महिला बचत गटाला माविम संकल्प सहयोगीणी उर्मीला मारगोनवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच गावातील पंचशील महिला बचत गटाची मशरूम लागवड लघुउद्योगाकरिता तालुकास्तरावर ५० हजार रुपयाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 

ग्रामपंचायत घाटकुळ तर्फे सरपंच प्रिती निलेश मेदाळे, उपसपंच गंगाधर गद्देकार, पं.स.उपसभापती विनोद देशमुख, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, तलाठी एस.कोला, सदस्य पत्रू पाल, अरुण मेदाळे,  प्रज्ञा देठे, सुनिता वाकुळकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे, रजनी हासे, पोलीस पाटील अशोक पाल, तं.मु.अध्यक्ष अशोक मेदाळे, राम चौधरी व गावक-यांनी बचत गट महिलांचे  अभिनंदन केले.

बचत गटामुळे महिला सक्षम
घाटकुळ गावाची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु आहे. ग्रामविकासात महिलांचा सक्रिय सहभाग असून बचत गटामुळे महिला सक्षम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सक्षम महिला मेळावा मुख्य बॅनर व निमंत्रणावर घाटकुळ येथील कृषीसखी मालन अशोक पाल झळकल्या आहेत. लघुउद्योगातून  सक्षमीकरणाचा संकल्प महिलांनी केला आहे.