गडचांदूर तालुका निर्मिती करिता व्यापाऱ्यांचा आज कडकडीत बंद : उद्या आझाद मैदान, मुंबई येथे करणार आंदोलन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर तालुका निर्मिती करिता व्यापाऱ्यांचा आज कडकडीत बंद : उद्या आझाद मैदान, मुंबई येथे करणार आंदोलन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर प्रतिनिधी -


 1. अनेक वर्षपासून गडचांदुर तालुक्याची निर्मिती व्हावी अशी गडचांदूर शहर व लगतच्या गावकऱ्यांची मागणी आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आज दिनांक 13सप्टेंबर 2019 रोजी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडला.

कित्येक वर्षांपासुन येथील नागरिक तालुका निर्मिती करिता  लढा देत असून शासनाकडून फक्त आश्वासनावरच आस ठेवावी लागत आहे. 

यापूर्वीही अनेक अधिवेशन पत्र व्यवहार, आमरण उपोषण सुद्धा केले.मात्र प्रत्येक वेळी आश्वासना शिवाय काहीच पदरी पडले नाही.मात्र आता जनता याला कंटाळून आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. शासनाला पुन्हा एकदा दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली

निव्वळ यावरच न थांबता  15 सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनासाठी  आजूबाजूच्या 54गावातील नागरिक मुबंई ला रवाना झाल्याची माहिती तालुका संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

तालुका निर्मितीसाठी सध्या 54 गाव अस्तित्वात असून राजुरा व जिवती या दोन तालुक्याच्या सिमा भागातील काही गावांचा समावेश केल्यास 65,70 च्या जवळपास गाव मिळवुन गडचांदुर तालुक्याची निर्मिती होऊ शकते.यासाठी नागरिकात जागृक्ता व आंदोलनाची व्यापक्ता वाढविली गेली आहे.

समितीने केलेल्या आवाहनाप्रमाणे शुक्रवार 14 सप्टेंबर रोजी सकाळ पासूनच येथील बाजारपेठे बंद होती.न.प.गट नेता निलेश ताजने,तालुका संघर्ष समिती संघटक उद्धव पुरी, अशोक कुमार उमरे,अहेमद भाई,तुळशीराम भोजेकर, चंद्रमणी उमरे,रमेश पेंदोर, काशिराम चूने,कल्पना अवताडे (नवेगाव), रेणुका गेडाम (तुमरीगुडा),तुषार (येरगुडा), रजनीकांत लालसरेसह, शहरातील अनेक व्यापारी व नागरिकांची मोठ्यासंख्यने गडचांदूर बंद आंदोलनात उपस्थीती होती.