अल्पवयीन मुलीची हत्या : नेमके कारण गुलदस्त्यात - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पवयीन मुलीची हत्या : नेमके कारण गुलदस्त्यात

Share This
खबरकट्टा /वर्धा : हिंगणघाट प्रतिनिधी :

शहरातील स्थानीय माता मंदिर वार्ड येथील साक्षी शरद सुरकार वय १७ वर्ष  या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. 

शहरालगत असलेल्या रिमडोह शिवारातील मधील द्वारकानगरी हे लेआऊट मकेश करवा आणि चंदाराणा यांनी डेव्हलप केले आहे यामध्ये हत्या करण्यात आल्याची माहिती आज सकाळी उघड़किस आली. येथील परिसरातील नागरिकांनी सकाळी हिंगणघाट पोलिसांना  दिली, ही हत्या रात्री झाली असावी अशी माहिती आहे.

मृतावस्थेत सापडलेल्या मुलीने टी-शर्ट परिधान केला असुन त्यावरती रक्ताचे डाग आहेत. नेमकी हत्या कोणत्या कारणावरून झाली असावी याची माहिती अजून पर्यंत समोर आलेली नाही.  सदर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरु आहे. शहरालगत असलेल्या शहरातील बाहेर असलेल्या लेआऊट वरती तरुण मुला व मुलींचा नेहमीच वावर असतो. हे लेआउट सुद्धा शहराच्या बाहेर असून  प्रेमप्रकारणातुन ही हत्या झाली असावी अशी चर्चा शहरात आहे.

तेव्हा संबधीत ले आकृट मध्ये अयाषी च्या धुमाकुळ असतो आणि प्रेम विहाराचे स्थान सुध्दा आहे अशी सुध्दा चर्चा आहे सबंधीत प्रकारात संशयाद पद आरोपी पंकज तडस (नादगांव)  याचा शोध बातमी लीहे पर्यत हिंगणघाट पोलीसा कडुन सुरु असुन सदर प्रकारात ठानेदार बडीवार याच्या मार्गदर्शना खाली उपपोलीस निरीक्षक प्रशांत पाठनकर करीत आहे.