राजुरा आदिवासी मुलींचे लैंगिक अत्याचाराचे प्रकरणात पत्रकार परीषदेतुन अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अॅट्रोसिटी अॅक्ट मध्ये अटक करा :जनसत्याग्रहातुन आदिवासी बांधवांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा आदिवासी मुलींचे लैंगिक अत्याचाराचे प्रकरणात पत्रकार परीषदेतुन अपमान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अॅट्रोसिटी अॅक्ट मध्ये अटक करा :जनसत्याग्रहातुन आदिवासी बांधवांची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -घनश्याम मेश्राम 

राजुरा येथिल आदिवासींचे दैवत  भिमदेव येथुन पदयात्रेची सुरवात करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर नारायनसिंह उईके यांच्या प्रतीमेला माल्यार्पन करुन राजुरा येथिल नामांकित इंग्लिश पब्लिक स्कुल येथे झालेल्या आदिवासी मूलींचे  लैंगिक अत्याचारातील पीढीत मुलींना न्याय  मिळावा यासाठी राजुरा येथे जनसत्याग्रह व पदयात्रा करण्यात आली. 


पिढीत मुलींना न्याय  द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, आरोपींना अटक करा, पत्रकारपरीषद घेवुन आदिवासींचा अपमान करनाऱ्या नेत्यांना अटक करा, पिढीत मुलींचे पुनर्वसन करा अशा घोषणा देत पदयात्रा निघाली यावेळी संपुर्ण राजुरा शहरातील जनता याची गंभिरतेने दखल घेत होती. 

सुभाष धोटे व विजय वड्डेटीवार यांनी पत्रकार परीषद घेवुन पिढीत मुलींचे पालकांना पास्को अंतर्गत पैसे मिळतात  म्हणुन तक्रारीत  वाढ होत आहे असे अपमान जनक व माणुसकला काळीमा फासनारे वक्तव्य केले होते. याचे पळसाद महाराष्ट्र भर उमटले होते अपमान करनारे वड्डेटीवर व धानोरकर हे राजकीय शक्तीच्या बळावर कोनतीही कार्यवाही होवु दिली नाही. यामुळे एकत्रीत येवुन गुन्हा करनारे सुटले कसे असा प्रश्न निर्माण झाल्याने आदिवासी बांधल पेटुन उठला आहे.
 

पदयात्रा तहसिलकार्यालया समोर आल्यानंतर सभामंडपात जनसत्याग्रहाला सुरवात झाली. यावेळी भगवान बिरसा मुंडा, विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. जनसत्याग्रहाचे रुपांतर सभेत झाले व सभेतुन शासनाचे तिव्र निषेध करण्यात आले व पिढीत मुलींना व आदिवासींचा अपमान करनारे गजाआड होईपर्यंत आंदोलन थांबनार नाही असे प्रण या सत्याग्रहातुन घेण्यात आले.


या सत्याग्रहात जिल्हापरीषदेचे सदस्य गोदरु पाटील जुमनाके, वाघुजी गेडाम,  श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, बापुराव मडावी, भारत आत्राम, आदिवासी विचारवंत दिपक मडावी,  बाबाराव मस्की, संतोष कुळमेथे, अभिलाष परचाके, महीपाल मडावी, राधाबाई आत्राम, क्रिष्णा गेडाम, नरेंद्र कुळमेथे, कंटु कोटनाके, पिढीत मुलींचे पालकांसह शेकडो नागरीक सहभागी होते.