जिल्हा परिषदच्या कृषी विभागाची कीटनाशक वापर जनजागृती रथाला हिरवी झेंडी : चंद्रपूर जिल्ह्यातील गावोगावी फिरून देणार माहिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषदच्या कृषी विभागाची कीटनाशक वापर जनजागृती रथाला हिरवी झेंडी : चंद्रपूर जिल्ह्यातील गावोगावी फिरून देणार माहिती

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -

दिवसेंदिवस केमिकल मिश्रित कीटनाशकांचा वापर शेतात वाढत असून, जरी कीटनाशकांचा वापर वापर काही ठिकाणी आवश्यक असला तरीही ते हाताळताना अनेक शेतकऱ्यांना जीवाशी मुकावे लागत आहे व त्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज दिनांक 09/09/2019 जिल्ह्यातील राबणारा शेतकरी मंडळींनी पिकांसाठी किटनाशक वापरतांना कोणती काळजी घ्यावी . या आशयाचे माहीती प्रदान जनजागृती रथ जिल्हा परीषद चंद्रपुरच्या कृषी विभागा कडुन तयार करण्यात आला असुन, जिल्हाभर रथा द्वारा जनजागरण करण्यात येणार आहे.


जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या शुभहस्ते रथाला आज हिरवी झेंडी दिली आहे.

हा जनजागरन रथ चंद्रपुर जिल्हातील गावा- गावात जावुन शेतात शेतक-यांनी कीटक नाशक वापरतांना  कशा प्रकारची काळजी  घ्यायला हवी याबाबत शेतक-यांना या रथा द्वारा माहीती पोहचवली जाणार आहे.

               
 शेतात किट नाशक वापरतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी यासाठी जिल्हा परिषद  रथा द्वारा शेतक-यांना माहीती देवुन जागृत करण्याच महत्वाचे  काम करित आहे. या जनजागृती मुळे शेतकरी जागृत होण्यास मद्त होणार आहे. -देवराव भोंगळे, अध्यक्ष , जि.प. चंद्रपुर.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ. अर्चना जिवतोडे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पं.स गोंडपिपरीचे सभापती दिपक सातपुते, जि.प. सदस्य संजय गजपुरे, हरिष गेडाम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  चंद्रकांत वाघमारे जिल्हा परिषदचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.