श्री रामपूर येथे तान्हापोळ्यातील अनेक संदेशात्मक कलाक्रुती ने वेधले नागरिकांचे लक्ष : चैतन्य इटनकर व दुर्वा बेले यांनी पटकविला पहिला क्रमांक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री रामपूर येथे तान्हापोळ्यातील अनेक संदेशात्मक कलाक्रुती ने वेधले नागरिकांचे लक्ष : चैतन्य इटनकर व दुर्वा बेले यांनी पटकविला पहिला क्रमांक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा प्रतिनिधी -

श्री रामपूर येथे  दरवर्षी प्रमाणे यंदाहि तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे  आयोजन श्रीरामपूर जय हनुमान देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले. हनुमान मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक बालगोपालांनि मोठ्या संख्येत सहभाग घेतला.


यावेळी विविध संदेशाच्या कलाक्रुती आकर्षक सजावट सादर करण्यात आल्या. चैतन्य रमेश इटनकर व दुर्वा बादल बेले यांनी बैलांची होणारी कत्तलखान्यातील हत्या व ट्रक्टरच्या स्वरूपातील आलेली आधुनिक शेतीची यंत्रसामुग्रीचा वाढता वापर  यावर आधारित कलाक्रुती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या कलाक्रुती चा प्रथम क्रमांक आला. 


द्वितीय  गीरसावळे , तिसरा  यश कूडे , चवथा  गणेश तीखे , यांचा क्रमांक आला. त्यांना स्वर्गीय नीलकंठ कूडे यांच्या स्म्रुती प्रीथ्यर्थ रमेश कूडे ,माजी सरपंच ,रामपूर यांच्या कडून  रोख रक्कम ,सन्मानचिन्ह  व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र घटे हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून रामपूर ग्राम पंचायत चे  माजी सरपंच  रमेश कुडे , मारोती जानवे , रमेश झाडे , वसंता चोखारे , मधुकर बोढे , मोरेश्वर झाडे ,सुरेंद्र मालेकर व जय हनुमान देवस्थान समितीचे पदाढिकारि आदींसह अनेक गणमान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेचे परीक्षण  श्रीकृष्ण गोरे , डॉ.गेडाम , शांताराम ऊपरे , शिक्षक गोरे आदिंनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता  श्रीरामपूर जय हनुमान देवस्थान समीतीचे सदस्य सुरेश गिरडकर , नामदेव तिखे ,अशोक नांदेकर ,लटारु गीरसावले , अनिल पिंपळकर ,सुरेश झाडे ,आकाश घटे आदिंनी अथक परिश्रम घेतले.