यांच जमलंय ! : किशोर जोरगेवार काँग्रेस कडून उमेदवार : आज झाला अधिकृत प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

यांच जमलंय ! : किशोर जोरगेवार काँग्रेस कडून उमेदवार : आज झाला अधिकृत प्रवेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

किशोर जोरगेवार यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर  दिल्ली  येथे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र  प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र विधानसभा गटनेते विजय वडेट्टीवार , निवडणुक प्रभारी  मुकुलजी वासनिक,  यांच्या उपस्थित प्रवेश केला.यावेळी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण माजी अध्यक्ष  प्रकाश देवतळे, नंदू  नागरकर,अशोक मत्ते, घुग्घुस कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या उपस्थिती होते. जोरगेवार   चंद्रपूर विधानसभेकरिता उमेदवारी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.विधानसभा 2014  मध्ये  ऐनवेळी भाजपा सोडून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत जोरगेवारांनी 52000 मतदानघेऊन आपली क्षमता सिद्ध केली होती.बहुप्रतीक्षित असलेले हे राजकीय समीकरण जोरगेवारांना विजयाकडे घेऊन जाऊ शकते असे शहरातील अनेक राजकीय समीक्षकांचे मत आहे.