संजय रणदिवे यांना अभियांत्रिकीतील दुर्मिळ डॉक्टरेट पदवी बहाल : त्यांच्या संशोधनाने वैद्यकीय प्रत्यारोपण (ऑर्गन इम्प्लांट ) क्षेत्रात क्रांती : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संजय रणदिवे यांना अभियांत्रिकीतील दुर्मिळ डॉक्टरेट पदवी बहाल : त्यांच्या संशोधनाने वैद्यकीय प्रत्यारोपण (ऑर्गन इम्प्लांट ) क्षेत्रात क्रांती :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

नागपूर येथिल विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी येथे पार पडलेल्या 17 व्या दिक्षांत समारोहात मूळ राजुरा येथिल व सध्या नागपुर येथिल रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत संजय मुर्लीधरराव रणदिवे ह्यांना अभियांत्रिकीतील बहुमुल्य संशोधनासाठी आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.

डॉ. संजय रणदिवे ह्यांनी मेडीकल इम्प्लांट साठी अॅनॅलिसिस ऑफ कास्टिंग टायटॅनियम (Ti-6AL-4V ASTM F-136 Grade 5) ह्या विषयात महत्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या ह्या संशोधनामुळे मेडिकल इम्प्लांट चा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होणार असुन ह्या संशोधनाद्वारे त्यांनी सँड कास्टिंग च्या मदतीने भारतातच तुलनेने अत्यंत कमी खर्चात मेडिकल इम्प्लांट तयार करण्यात यश मिळविले असुन ह्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण होणार आहे. एखाद्या व्यक्तीचे हाड मोडले असता त्यात हे मेडिकल ऑर्गन इम्प्लांट वापरता येणार असुन ह्यामुळे रुग्णाचे कमी खर्चात उपचार होण्यास हे संशोधन महत्वाचे ठरणार आहे.

डॉ. संजय रणदिवे हे मुळ राजुरा शहरातील रामनगर येथील रहिवासी असुन त्यांचे संपुर्ण बालपण आणि शालेय शिक्षण राजुरा येथेच झालेले आहे. तलाठी  असलेले मुर्लीधर रणदिवे ह्यांचे ते लहान पुत्र असुन त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या जीवन शिक्षण प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा येथे पुर्ण केले आहे. 

मुळातच हुशार आणि शांत स्वभावाच्या संजय रणदिवे ह्यांनी आपले अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम ब्रम्हपुरी येथिल शासकीय पॉलिटेक्निक येथुन मेकॅनिकल शाखेत पूर्ण केले त्यांनतर पदवीचे शिक्षण त्यांनी किट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे तर पदव्युत्तर शिक्षण जागतिक दर्जाच्या खडगपूर येथिल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ  टेक्नॉलॉजी (IIT) येथुन पुर्ण केले.

पुढे त्यांनी रामटेक येथिल किट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ वर्षे सहय्यक प्राध्यापक म्हणुन कार्य केले तर सध्या ते नागपुर येथिल रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. 

टीम खबरकट्टा तर्फे डॉ. संजय रणदिवे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.


खबरकट्टा च्या वरोरा भद्रावती व्हाट्स अप (whats app) ग्रुप वर सामील होण्याकरिता खालील लिंक वर टच करा व वाचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या. https://chat.whatsapp.com/IbPvfrrPqYu0jxkSM9UYGr