गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे पोलीस सारथी कार्यक्रम संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे पोलीस सारथी कार्यक्रम संपन्न

Share This
खबरकट्टा /संतोष इंद्राळे - जिवती प्रतिनिधी 

चंद्रपुर पोलीस व जिवती पोलीस स्टेशन च्या वतीने गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे पोलीस सारथी कार्यक्रम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पांडुरंग सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 


या प्रसंगी प्रोजेक्टर च्या साहाय्याने गोपाल किरडे, सचिन मोहूर्ले पोलीस कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालय विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी सुरक्षितते साठी कोणती काळजी घ्यावी यावर प्राचार्य यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी पोलीस प्रशासना कडून तक्रार निवारण पेटी लावण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर पवार व आभार विजय कौशले या विद्यार्थ्यानी केले.