महाराष्ट्र विधानसभेकरिता कॉंग्रेसकडून पहिली यादी जाहीर : साठ नावे निश्चित : ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार तर साकोलीत नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र विधानसभेकरिता कॉंग्रेसकडून पहिली यादी जाहीर : साठ नावे निश्चित : ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार तर साकोलीत नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच कॉंग्रेस ने वेळ न दवडता राज्यभरातील तब्बल 60उमेदवारांची नावे  निश्चित केली असून पहिल्या यादीत 25 आमदारांना व दोन इतर उमेदवारांना  कॉंग्रेस ने उमेदवारी दिली आहे. 
                  

छाननी समितीच्या बैठकीत हि यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या बहुतांश इच्छुकांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांची नावे जाहीर केली आहेत. यादीनुसार खालील उमेदवार कॉंग्रेस ने जाहीर केली आहेत.

 1. बाळासाहेब थोरात (संगमनेर), 
 2. विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), 
 3. अशोक चव्हाण (भोकर),  
 4. पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), 
 5. के सी पडवी (अक्कलकुवा), 
 6. नसीम खान (चांदिवली), 
 7. वर्षा गायकवाड (धारावी), 
 8. अमीन पटेल (मुंबादेवी), 
 9. विश्वजित कदम (पलूस कडेगाव), 
 10. प्रणिती शिंदे (सोलापूर मध्य), 
 11. अमित देशमुख (लातूर शहर), 
 12. नाना पटोले (साकोली), 
 13. अमर काळे (आर्वी ), 
 14. राहुल बोंद्रे (चिखली), 
 15. यशोमती ठाकूर (तिवसा), 
 16. वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), 
 17. अमित झनक (रिसोड), 
 18. हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), 
 19. काशीराम पावरा (शिरपूर),  
 20. कुणाल पाटील (धुळे), 
 21. धनाजी अहिरे (साखरी), 
 22. स्वरूप सिंह नायक (नवापूर), 
 23. असिफ शेख (मालेगाव मध्य), 
 24. रणजीत कांबळे (देवळी), 
 25. वसंत चव्हाण (नायगाव), 
 26. संग्राम थोपटे (भोर), 
 27. डॉ संतोष टारफे (कळमनुरी), 


या उमेदवारांची नावे कॉंग्रेस ने जाहीर केली आहेत.