पाच पुरस्कार प्राप्त करून ठरला अव्वल आशिष चौधरी : गोंडवाना विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाच पुरस्कार प्राप्त करून ठरला अव्वल आशिष चौधरी : गोंडवाना विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -


श्री ज्ञानेश विद्यालय नावरगाव येथे गोंडवाना विद्यापीठ  गडचिरोली यांचा मार्फतिने इंद्रधनुष्य-2019 ललित कलेचा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.


या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात रांगोळी, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र, स्थळ चित्र, आणि चित्रकला असे एकूण पाच पुरस्कार प्राप्त करून  श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथील एम.ए. ला असलेल्या आशिष देवाजी चौधरी या  विद्यार्थ्यांनी स्पर्धेत एक वेगळी छाप सोडली आहे..

त्याने अनुक्रमे रांगोळी स्पर्धेत प्रथम, पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम, व्यंगचित्र स्पर्धेत द्वितीय, स्थळचित्र स्पर्धेत द्वितीय, व चित्रकला स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्राप्त केले. तो अभिमानास प्राप्त ठरला आहे. 

सदर कार्यक्रमा प्रसंगी डॉ. प्रिया गेडाम, प्रा.डॉ.सुरेश बाकरे, सिनेट सदस्य डॉ.प्रमोद शंभरकर, समनवयक ललित उजेडे, वासंती रेवतकर, यांचा प्रमुख उपस्थितीत ट्रॅफि व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  

पाच पुरस्कार प्राप्त केल्याने प्राध्यापक, विद्यार्थी व मित्र मंडळी कडून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.