कीटकनाशक औषधीची फवारणीची विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कीटकनाशक औषधीची फवारणीची विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -राजुरा : इर्शाद शेख -विहीरगाव 

तालुक्यातील विहीरगाव येथील गोसाई गणपत सोनुले (वय ४५) यांना विषबाधा झाल्याने आज दिनांक १ सप्टेंबर रोज रवीवरला सकाळी ९ वाजता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय राजुरा मृत्यू झाला.

     
गोसाई हे मागील तीन दिवसांपासून शेतात कीटकनाशक औषधीची फवारणी करीत होते, काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते आज सकाळी राजुरा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या पश्च्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा आप्तपरिवर आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबातील करता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.