शेतकरी संघटनेतर्फे शरद जोशी यांच्या 84व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न : 32दात्यांनी केले रक्तदान : 6 व्यक्तींचा अवयव दानाचा संकल्प - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी संघटनेतर्फे शरद जोशी यांच्या 84व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न : 32दात्यांनी केले रक्तदान : 6 व्यक्तींचा अवयव दानाचा संकल्प

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी -

शेतकरी संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते युगात्मा शरद जोशी यांच्या 84 व्या जयंती निमित्त आज दि. 3 सप्टेंबर 2019 रोजी शेतकरी संघटनेतर्फे राजुरा येथील राम मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
             
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या हस्ते  युगात्मा शरद जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबीराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिरात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच 6 व्यक्तींनी  स्वेच्छेने अवयव दान करण्याचा संकल्प केला. 


या प्रसंगी ऍड मुर्लीधरराव देवाळकर, प्रभाकरराव दिवे, डॉ भूपाळ पिंपळशेंडे, प्रा. अनिल ठाकुरवार, रमेश नळे, अरुण नवले, कपिल इद्दे, मधू चिंचोलकर, पद्माकर मोहितकर, बंडू राजूरकर, दिलीप देरकर, भाऊजी कन्नाके, शेषराव बोन्डे, प्रभाकर ढवस, नरेंद्र काकडे, दिनकर डोहे, सय्यद शौकत अली, हसनभाई रिजवी, मदन पा. सातपुते, निखिल बोन्डे, सुरज जीवतोडे, सुरज बोरकुटे, मंगेश कोंडेकर, अझर हुसेन ई. सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.