चिमूर येथे अतिरिक्त अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी : 6पदांसहित वेतनश्रेणीही निश्चित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर येथे अतिरिक्त अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी : 6पदांसहित वेतनश्रेणीही निश्चित

Share This
चिमूर क्रांती भूमीला जिल्हा घोषित करण्याची मागणी गेली ३५-४० वार्षपासून असून या मागणी कडे सत्ताधारी मंडळींनी दुर्लक्ष केले होते सदर प्रलंबित मागणी ध्यानात घेता  चिमूर जिल्हा होईल पण त्याआधीच  अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या दोन घोषणा मुख्यमंत्र्यांनी  केल्या होत्या. 


त्यापैकी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय मागील वर्षीच सुरू झाले असून घोषणा केलेल्या चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरी बाबत मंत्रालय स्तरावर विविध विभागाच्या मंजुरीच्या कचाट्यातून हा प्रश्न मार्ग काढीत नुकतेच उच्च स्तरीय समितीने (एच पी सी) ८जुलै ला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालायातील अजय मेहता मुख्यसचिवांचे अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समितीने चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयच्या अप्पर जिल्हाधिकारी या पदासह सहा पदे मंजूर केली असून त्याचे पदनिर्मिती व वेतनश्रेणी निश्चित केली आहे.

मंजूर पदात अप्पर जिल्हाधिकारी १पद, नायब तहसिलदार १ पद,लघुलेखक १ पद ,अव्वल कारकून १ पद , लिपिक टँकलेखक २ पद ६पदाना मान्यता दिली तसेच चालक व शिपाई बाह्यस्रोत द्वारे भरण्यास मान्यता दिली होती तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्यामान्यतेसाठी सादर करण्यात आला.

त्यांनतर आज सोमवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापने सह नवीन पदनिर्मितीस मान्यता दिली.