राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच चंद्रपूर जिल्ह्यातील 68आरोपीना तडीपार करण्याचे आदेश. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच चंद्रपूर जिल्ह्यातील 68आरोपीना तडीपार करण्याचे आदेश.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


राज्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच जिल्हाधिकारी कुनाल खेमनार यांनी आदर्श आचारसंहिता साठि चंद्रपुर जिल्ह्यातील सहाही विधानसभा ७०- राजुरा, ७१ - चंद्रपुर,७२ - बल्लारपुर,७३ - ब्रम्हपुरी,७४ - चिमूर, ७५ - वरोरा  या विधानसभा साठि निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे ठिकान व तालुक्याचे नाव देण्यात आलेले आहेत. 


या सहा विधानसभा क्षेत्रामधे १७७०४११ एकूण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून चंद्रपुर जिल्ह्यात  मधे मतदान शांततेत पार पडावी व आदर्श आचार साहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस प्रशासणाला देण्यात आले असल्याची सूचना दिली.  

चंद्रपूर जिल्हा अधिकारी खेमनर यांनी आज पासून सुरु झालेल्या २०१९ विधानसभा निवडणुकीतील आचार सहितेबाबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आचारसंहितेचे  उल्लंघन करणाऱ्यांवर  कठोर कारवाही केल्या जाईल असेही सांगितले.

निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या  यंत्रनेबाबात अधिक माहित देतांना एकूण ९२४० कर्मचारी  कार्यरत केल्या गेले असून. यामध्ये EVM VVPAD ३८२३, २०७२३ व २७१४ या उत्तर प्रदेश येतून फत्तेपूर मधून आणल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

सोबतच विधानसभा २०१९ च्या आचारसंहितेला आज पासून सुरुवात होताच पोलीस प्रशासनाने  ६८ आरोपींणा ताडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत नसतील ते अशा मतदारांसाठी २७ सेप्टबर पर्यंत ओंनलाइन प्रक्रिया सेतू माध्ये  जाऊन नोंदवू शकतात.