मुक्ताबाई येथे धबधबा चा आनंद घेण्यासाठी जात असताना डोमा शिवरा पाटीवर दोन गाड्यांची धडक : 6 जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मुक्ताबाई येथे धबधबा चा आनंद घेण्यासाठी जात असताना डोमा शिवरा पाटीवर दोन गाड्यांची धडक : 6 जखमी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

शंकरपूर येथून जवळच असलेल्या डोमा शिवरा पाटीवर दोन चार चाकी प्रवासी गाड्यांची ची समोरासमोर धडक झाल्याने 6 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज 4 .30 च्या दरम्यान घडली.

मुक्ताबाई येथे धबधबा चा आनंद घेण्यासाठी जात असताना डोमा शिवरा पाटीवर दोन्ही गाड्या   एम एच  36एच.1788,  वि एम एच.49 एफ .1210 समोरासमोर आल्याने अपघात झाला असून. 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत निशा वैरागडे (35),  पूर्वा वैरागडे(11), सलोनी  वैद्य(12), सुषमा वैद्य (36) ,शोभा ठोंबरे (45), कुंदा वैरागडे( 40 )जखमींची नावे असून राहणार धादला तहसील मौदा जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून त्यांना  शंकरपुर ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे अधिक तपास शंकरपूर पोलीस करीत आहेत .