बल्लारपूर पोलिसांची डीजे वाजविणाऱ्या 5 गणेश मंडळावर धडक कारवाई - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर पोलिसांची डीजे वाजविणाऱ्या 5 गणेश मंडळावर धडक कारवाई

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :बल्लारपूर:

आज दि,12 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे ला परवानगी नसताना सुद्दा सार्वजनिक गणेश मंडळ नी डीजे  वर थिरक्ताना आणि मोठ्या आवाजात डीजे चालू असताना बल्लारपूर पोलीसांनी धडक कारवाई केली.  


बल्लारपूरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे, जिवती, कोठारी, राजुरा, चंद्रपूर, असे विविध भागांतील ठाणेदार व पोलीस कर्मचारी बंदोबस्त करिता तैनात करण्यात आले आहे, काही सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी नसतांना सुद्दा डीजे लावला त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक भगत यांनी 5 गणेश मंडळावर डीजे वर कारवाई केली आहे.विसर्जन मिरवणूक आटोपल्यावर कारवाही झालेले डीजे बॉक्स जप्त करण्यात येणार आहेत.

काही मंडळांनी कारवाई करण्यात येत असल्याचे कळताच आपले डीजे चे आवाज कमी केले तर काही मंडळाने डीजे बंद केले.