माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांच्या ताफ्याला जबर अपघात :चालकासहित 3 सुरक्षारक्षक गंभीर जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांच्या ताफ्याला जबर अपघात :चालकासहित 3 सुरक्षारक्षक गंभीर जखमी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
अद्यावत वृत्त : सकाळी 11:10: गंभीर जखमी  चालक झाडे व सिआरपीएफ सुरक्षा रक्षक जवान पटेल यांचा ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू. 
चालक विनोद विठ्ठल  झाडे (चंद्रपूर), एएसआय विजयकुमार, फलजीभाई पटेल, एम.जी. साजिद, जयदीपकुमार, प्रकाश भाई आणि बनवारीलाल रेगट (सर्व सीआरपीएफ) असे सातजण त्या गाडीत होते.
------------------------------------------------------------
वृत्त : सकाळी 10:05 

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीला नागपूर-चंद्रपूर हायवे रोडवर जाम पासून अवघ्या काही किलोमीटर आधी आज सकाळी अपघात झाला असून 3 सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहे.
आज सकाळी 7:30 वाजता अहिर हे दिल्ली करिता चंद्रपूर  निवासस्थानाहून निघाले असताना, नागपूर विमातळावर पोहोचण्याकरिता  जाम च्या काही किलोमीटर आधी  त्यांच्या ताफ्यामधील सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या गाडीला एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने धडक दिली यामध्ये चालकासहित  3 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मात्र अहिर हे समोरच्या गाडीत असल्याने ते सुखरूप आहे, अपघात होताच अहिर यांनी तात्काळ गंभीर जखमी सुरक्षारक्षकांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.