तान्हापोळ्यात देवांशु देवीदास कुईटे यांच्या संदेशात्मक कलाकृती कलम 370 ने वेधले सर्वाचे लक्ष : पटकविले प्रथम पारितोषिक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तान्हापोळ्यात देवांशु देवीदास कुईटे यांच्या संदेशात्मक कलाकृती कलम 370 ने वेधले सर्वाचे लक्ष : पटकविले प्रथम पारितोषिक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी -

राजुरा शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाहि तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धेचे  आयोजन हनुमान देवस्थानच्या वतीने करण्यात आले होते. जुना बसस्थानक हनुमान मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या स्पर्धेत शहरातील अनेक बालगोपाळांचाही मोठ्यासन्खेने सहभाग होता.


यावेळी विविध संदेशाच्या कलक्रुती आकर्षक सजावट सादर करण्यात आल्या. देवांशु देवीदास कुईटे या बालकाणे सैनिकाच्या वेशभूषेत कलम 370 आणि "we want our pok  " यावर आधारित कलाक्रुती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या कलाक्रुती चा प्रथम क्रमांक आला. द्वितीय  प्रतीक संतोष कोकोडे , तिसरा  सम्राट संतोष चंदनखेडे , चवथा  प्रिया कातखडे , पाचवा  पवन संदीप बानकर यांचा आला. त्यांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह पारितोषिक प्रदान करण्यात आले.
फोटो :आमदार ,संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन नीमकर ,वामनराव चटप यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार स्वीकारताना देवांशु देवीदास कुईटे व त्याचे पालक


कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन नीमकर हे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून आमदार,ऍड. संजय धोटे, माजी आमदार वामनराव चटप, अविनाश जाधव, सीधार्थ पथाडे ,रमेश नले ,अनिल ठाकुरवार ,स्वामी येरोलवार ,राधेश्याम अडानिया , गणेश रेकलवार, हनुमान देवस्थान समितीचे पदाढिकारि आदींसह अनेक गणमान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे परीक्षण बी.यू.बोर्डेवार , राजेश खेरानी, बादल बेले, अनिल बाळसराफ ,आदिंनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अँड.नीनाद येरणे,अँड.अरुण धोटे,सतीश धोटे यांनी केले तर आभार सुरेश रागिट यांनी मानले.