महाराष्ट्र पोलीस दलात 3459 जागांसाठी भरती : 23 सप्टेंबर शेवटची तारीख : जाणून घ्या निवड प्रक्रियेतील बदल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र पोलीस दलात 3459 जागांसाठी भरती : 23 सप्टेंबर शेवटची तारीख : जाणून घ्या निवड प्रक्रियेतील बदल

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र : 
महाराष्ट्र पोलीस दलात 3459 जागांसाठी भरती होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व आयुक्तालय पोलीस परीक्षेत्रामध्ये ही भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे. भरतीची जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून मुंबईसाठी सर्वाधिक 1076, त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी सर्वाधिक 720 जागांसाठी भरती होईल.


विशेष म्हणजे गृहविभागाने मोठे बदल केल्यानंतर, तसेच महापोर्टलद्वारे राज्यात होणारी ही पहिली भरती प्रक्रिया आहे. भरतीप्रक्रियेसाठी 3 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून 23 सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ठेवली आहे.

वेबसाईट- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

जिल्हानिहाय जागा –
पुणे रेल्वे पोलीस भरती – 77
पुणे ग्रामीण पोलीस भरती – 21
पुणे शहर पोलीस भरती – 214
पिंपरी चिंचवड पोलीस भरती – 720
मुंबई पोलीस भरती – 1076
नवी मुंबई पोलीस भरती – 61
मुंबई रेल्वे पोलीस भरती – 60
रत्नागिरी पोलीस भरती – 66
ठाणे पोलीस भरती – 100
रायगड पोलीस भरती – 81
सातारा पोलीस भरती – 58
औरंगाबाद पोलीस भरती – 91
नागपूर पोलीस भरती – 288
धुळे पोलीस भरती- 16
नंदुरबार पोलीस भरती -25
भंडारा पोलीस भरती – 22
सिधुदुर्ग पोलीस भरती – 21
जालना पोलीस भरती -14
कोल्हापूर पोलीस भरती – 78
सोलापूर पोलीस भरती – 76
पालघर पोलीस भरती – 61
जळगाव पोलीस भरती -128
सांगली पोलीस भरती – 105
एकूण – 3459

◼निवड प्रक्रिया –
यापूर्वी पोलीस भरती परीक्षेत मैदानी चाचणी अगोदर घेतली जात असे. उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारालाच लेखी परीक्षेला पात्र ठरवले जात असे. मात्र, नवीन निर्णयानुसार पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा पूर्वीप्रमाणेच 90 मिनिटांची 100 गुणांची घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेतून एका जागेसाठी 10 याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार आहे. लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान 35 % गुण मिळणे आवश्यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांना 33 % टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

◼अर्ज करण्याची मुदत –
अर्ज करण्याची तारीख – 3 सप्टेंबर 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2019

◼ आवश्यक कागदपत्रे –
◾ MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
◾डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)
◾ नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
◾ जात प्रमाणपत्र वैधता
◾ सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
◾खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी
◾ आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
◾ लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक, आधारकार्ड यापैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे.