धावत्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले : मागोमाग धावत होत्या 3 पॅसेंजर : स्टेशन मास्तर च्या तत्परतेने मोठा अनर्थ टाळला - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धावत्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले : मागोमाग धावत होत्या 3 पॅसेंजर : स्टेशन मास्तर च्या तत्परतेने मोठा अनर्थ टाळला

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

काल रात्री चंद्रपूर रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर 12:07 वाजता येत असलेल्या मालगाडी च्या इंजिनचे मागचे डब्बे रेल्वे रुळावरून घसरले.पाठोपाठ 3पससेंजर गाड्या चे वेळापत्रक असल्याने, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. 


मालगाड़ी नंतर गाडी नंबर 2670,2655,तसेच नवजीवन एक्सप्रेस प्लॅटफॉर्म वर काही वेळातच मार्गक्रमण करणार असल्याची सूचना आल्यानंतर तात्काळ वायरलेस सूचना देत प्रवाशी गाड्या थांबविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.  

सदर  मालगाडी रात्री बारा वाजता प्लॅटफॉर्म वर पोहोचत असताना मागचे 2दोन डब्बे घसरून काही अंतर मागे सरकून रेल्वे रुळाच्या बाजूला घसरून पडले होते,  विरुद्ध  घसल्यानंतर नागपूर विभाग ला सूचना करण्यात आल्या. त्यानंतर लगेच बारा वाजता नागपुर व वर्धा वरून दुर्घटना बचाव कार्य गाडी पाठविण्यात आली व सकाळी 3 वाजता चंद्रपूरला पोहोचल्यानंतर वर्धा, नागपुर  येथून 20 ,25 बचाव कर्मचाऱ्यांनी येऊन तात्काळ घटनस्थळावरून मालगाडीचे डब्बे हटवत, रेल्वे रूळ दुरुस्त करून मार्ग सुरळीत करण्यास यश मिळविले.


दुर्घटना स्थळ दुरुस्त होत पर्यंत प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणाऱ्या काही गाड्या टीसीएल लाईन वरून पाठविन्यात आल्या. तसेच दोन गाड्या ब्रेकडाऊन करण्यात आल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांची  दाखविल्यामुळे चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर होणारी मोठी दुर्घटना टळली.