महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना,जिल्हाप्रमुख बंडू हजारेंची कामगारांच्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी धडपड : 2 दिवसात किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना,जिल्हाप्रमुख बंडू हजारेंची कामगारांच्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी धडपड : 2 दिवसात किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना च्या वतीने आज दिनांक १४/९/२०१९ ला मा.ना.सुधीरभाऊ मुंगटीवार  अर्थ , नियोजन,  वने ,पालकमंत्री  चंद्रपुर जिल्हा यांना   चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र(CSTPS) येथील कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारें यांनी असंख्य कंत्राटी कामगारांना सोबत भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. 

पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनीही तबड़तोब २ दिवसात  किमान वेतन चा प्रश्न मार्गी  लावण्याचे  सांगितले व सदर माहिती प्रत्यक्षात पत्र लिहून व  फ़ोन करून ताबडतोब आदेश केले. प्रत्यक्ष माहिती करीता  मा.ना.चंद्रशेखरजी        बावनकुळे ऊर्जा मंत्री मा. राज्य. यांच्या कड़े दिनांक१६/९/२०१९ ला मुम्बई ला  बैठकी करीता बोलविन्यात आले आहे.  

तसेच संघटनेच्या  पदाधिकारी यांना रिसीव  कॉपी मिळाली आहे असे बंडू हजारें यांनी टीम सोबत बोलताना सांगितले असून महाराष्ट्र  राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना ही वर्तमाणात तसेच भविष्यात सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यशील राहील असेही मत व्यक्त केले.

दोन(२) दिवसात प्रश्न  मार्गी लागेल या प्रसंगी निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी  सेना चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष श्री. बंडूभाऊ हजारे , यूनिट अध्यक्ष श्री. प्रफुलभाऊ सागोरे , यूनिट सहसचिव संतोषभाऊ ढोक  उपस्थित होते.   

अधिक वाचा : कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाने वाढदिवसास साजरा करणारा सच्चा शिवसैनिक - बंडू हजारें                      https://www.khabarkatta.com/2019/09/blog-post_42.html