21 ऑक्टोबर विर बाबुराव शेडमाके जयंतीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवाच्या सन्मानार्थ मतदानाच्या तारिखेत बदल करण्याची राजू झोडे यांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

21 ऑक्टोबर विर बाबुराव शेडमाके जयंतीचे औचित्य साधुन आदीवासी बांधवाच्या सन्मानार्थ मतदानाच्या तारिखेत बदल करण्याची राजू झोडे यांची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

भारतीय निर्वाचन आयेगाने महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे.दि.21 सप्टेंबर 2019 ला एकाच टप्प्यात निवडणुकीत मतदान होणार आहे. परंतु मतदानाच्याच दिवशी विर बाबुराव शेडमाके यांची जयंती येत असल्याने संपुर्ण आदिवासी बांधव हा विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती उत्सवात राहणार तसेच ह्या गोष्टीचा मतदानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संपुर्ण आदिवासी बांधवाची अस्मीता व विर बाबुराव शेडमाके यांच्या आदराप्रती त्यांच्या एवढ्या मोठ्या उत्सवात विघ्न येऊ नये करिता दि.21 सप्टेबंर ही निवडणुकीची तारिख बदलवुन देण्यात यावी करिता राजुभाऊ झोडे यांनी निवडणुक आयोगाकडे मागणी केली आहे.

सविस्तर मागणीचा व आदिवासी बांधवांच्या भावनेचा विचार करुन निवडणुक मतदानाची तारिख बदलविण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाला राजुभाऊ झोडे यांनी केली आहे.