ब्रेकिंग न्यूज : भाजपच्या 'या' विद्यमान 20 आमदारांना मिळणार डच्चू , दिल्ली दरबारात झाला निर्णय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : भाजपच्या 'या' विद्यमान 20 आमदारांना मिळणार डच्चू , दिल्ली दरबारात झाला निर्णय

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 
विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने जागावाटपा संदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच भाजप या निवडणुकीत काही विद्यमान आमदारांची तिकीट कापणार आहे. 

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या झालेल्या बैठकीत काही डच्चू देण्यात येणाऱ्या आमदारांची नावं अंतिम करण्यात आली असल्याची माहिती नागपूर येथील  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली असून तिकीट कटलेल्या 20आमदारांची नावे खात्रीलायक अधिकृत आहेत.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय संयंसेवक संघाने काही जागांवरील बदलाची सूचना केल्याची माहिती आहे. तसेच, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

1) राजकुमार बडोले- अर्जुनी मोरगाव
2) दिलीप कांबळे- पुणे छावणी
3) विलासराव जगताप- जत
4) शिवाजी कर्डीले- राहुरी
5) भारती लवेकर- वर्सोवा
6) कॅप्टन तामिळ सिल्वन – सायन कोळीवाडा
7) मंदा म्हात्रे – बेलापूर
8) संजय केळकर – ठाणे शहर
9) विष्णू सावरा- विक्रमगड
10) संगीता ठोबरे – केज
11) अनिल गोटे- धुळे शहर
12) देव्यांनी फरांदे- नाशिक
13) प्रकाश मेहता – घाटकोपर पूर्व
14) राम कदम – घाटकोपर पश्चिम
15) सरदार तारासिंग -मुलुंड
16) विद्या ठाकूर – गोरेगाव
17) डॉ.मिलिंद माने- नागपूर उत्तर
18) गोवर्धन शर्मा- अकोला पश्चिम
19) अमरीश आत्राम- अहेरी 
20) चरण वाघमारे- तुमसर