ब्रेकिंग न्यूज : 20 लाखाची रोकड महामंडळाच्या बसमधून जप्त : रोकड थैली स्वीकारण्यास प्रवाश्यांचा नकार : निवडणुकीसाठी वापर होनार असल्याचा संशय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : 20 लाखाची रोकड महामंडळाच्या बसमधून जप्त : रोकड थैली स्वीकारण्यास प्रवाश्यांचा नकार : निवडणुकीसाठी वापर होनार असल्याचा संशय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा 


वरोरा विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी स्थाई निगराणी पथकाने वरोरा – वणी दरम्यान पाटाळा चेक पोस्टवर वणी – काटोल बस मधून 20 लाख रुपयाची संशयित रोकड जप्त केली. 

ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास करण्यात आली. इतकी मोठी रोकड कुणाची? या बाबत मतदारसंघात उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे.

राज्यात निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली असून अर्ज भरण्यास सुरवातही झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदाराला प्रलोभने दाखवण्याकरीता राजकीय पक्ष व उमेदवाराकडून दारू व पैशाचा वापर केला जातो. असे प्रकरण टाळण्यासाठी निवडणूक विभाग लक्ष ठेवून आहे. मतदारसंघात ठीकठिकाणी भरारी पथक कार्यरत करण्यात आले असून त्याचे कडून मुख्य मार्गावरील चेक पोस्ट वर नाकाबंदी केल्या जात आहे. निगराणी पथकाकडून शुक्रवारी सायंकाळी 4:30 वा. सुमारास वरोरा – वणी मार्गावरील पाटाळा चेकपोस्टवर चेकिंग चालू असताना वणी – काटोल बस क्रमांक एम.एच 40- 5894ची तपासणी केली असता सदर बस मध्ये काळया रंगाच्या संशयित बॅग दिसली. 

बॅग बद्दल विचारले असता कोणीच बोलले नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात 20 लाख रुपये आढळले. सदर रकमेबाबत चौकशी केली असता कोणत्याही प्रवास्याने ती रक्कम आपली असल्याचे सांगितले नाही. करिता सदर निगराणी पथकाचे प्रमुख ए.वी.भरडे यांच्या पथकाने जप्तीची कारवाई करुन रक्कम जमा केली.  
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून उपकोषागार कार्यालय वरोरा येथे रक्कम जमा करण्यात आली. निवडणुकीत या रकमेचा वापर करण्यात येणार होता का? हा तपासाचा विषय आहे. 

निवडणुक निर्णय अधिकारी (75 – वरोरा विधानसभा) तथा उपविभागीय अधिकारी श्री सुभाष शिंदे यांचे मार्गदर्शनात भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या मोठ्या कारवाई बद्दल भरारी पथकाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.