जिवती तालुक्यातील 2 ग्रामपंचायतिचा निकाल जाहीर : विजयी उमेदवारांत युवकांचे वर्चस्व - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यातील 2 ग्रामपंचायतिचा निकाल जाहीर : विजयी उमेदवारांत युवकांचे वर्चस्व

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

संतोष इंद्राळे जिवती : : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या जिवती तील कुंभेझरी व पुडीयालमोहदा या ग्रामपंचायतिचा निकाल आज घोषित करण्यात आला.हा संपूर्ण निकाल पाहता ह्या निवडणुकीत युवकांचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सरपंच व सदस्य खालीलप्रमाणे.

◼कुंभेझरी ग्रामपंचायत : : येथे सरपंचपदासाठी म्हणून सौ.कमल अंबादास जाधव तर सदस्यपदी : : 1)मुद्रिका कांबळे 2) छाया जीवतोडे 3) उत्तम कराळे 4)संतोष पवार 5) पुष्पाताई पट्टेवाले 6) रूकमाबाई पवार 7) लहुजी गोतावळे 8) सविता वाघमारे 9) बाळु ठोंबरे 10) रवी जेवाले 11) ताईबाई पवार 

◼ पुडीयालमोहदा ग्रामपंचायत : : येथे सरपंच पदासाठी मा.पुंडलिक शिवाजी गिरमाजी तर सदस्यपदी : : 1 ) लक्ष्मीबाई कोठुळे 2) भगवान गिते 3) राजाबाई शिंदे 4) अनुसया हुके 5) दत्तात्रय कांबळे 6) रामराव इंगळे.
ही मतमोजणी तहसील कार्यालय जिवती येथे पार पडली त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता,व निकाल लागताच निवडून आलेल्या उमेदवारांना उचलून कार्यकर्त्यांनी चांगला आनंदोत्सव साजरा केला व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे,ही निवडणूक पहिल्यांदाच थेट लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे , यासाठी अधिक चुरस वाढली होती याचा फायदा कुणाला होईल म्हणून या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिवती तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते.