जिवती 2 ग्रामपंचायतीसाठी जिवती तालुक्यात 74.81 टक्के मतदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती 2 ग्रामपंचायतीसाठी जिवती तालुक्यात 74.81 टक्के मतदान

Share This
खबरकट्टा /संतोष इंद्राळे -जिवती : 

जिवती तालुक्यातील 2 गावच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल दि.31/08/2019 ला शनिवारी शांततेत मतदान झाले,सरपंच व सदस्य पदासाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली.


सर्वाधिक मतदान पुडीयालमोहदा येथे 74.81 टक्के मतदान झाले,तर कुंभेझरी येथे 72.85 टक्के मतदान झाले,कुंभेझरी या ग्रामपंचायत मध्ये 4 वार्डासाठी एकूण मतदान 2295 आहे, त्यापैकी पुरुष मते 1203 तर महिला मते 1092 आहेत,यात पुरुषांनी 885 तर महिलांनी 787 इतके मतदान केले. 

पुडीयालमोहदा यात 3 वार्डासाठी  1409 एकूण मतदार  असून यात पुरूष 737 तर महिला 672 आहेत यात पुरुषांनी 571 व महिलांनी 528 इतके मतदान केले.तालुक्यातील या टप्यात एकूण 3704 इतकी मतदार संख्या होती,त्यापैकी 2771 मतदारांनी मतदान केले असल्याने मतदानाची टक्केवारी  74.81 टक्के इतकी झाली आहे,व याचा निकाल 3 सप्टेंबर 2019 ला आहे,तरी या निकाला कडे तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे हे मात्र खरे...