शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर : 18 वर्षाची परंपरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर : 18 वर्षाची परंपरा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार स्व.शरद जोशी यांच्या जन्मदिनानिमीत्त दिनांक 3 सप्टेंबर 2019रोज मंगळवारला राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील राम मंदीर सभागृहात सकाळी 10 ते 2वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटना, शेतकरी युवा आंघाडी व शेतकरी महिला आघाडीने केले आहे.

गेल्या 18वर्षापासुन शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद जोशी यांचा जन्मदिन रक्तदानाने साजरा करतात. यावर्षीही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन माजी आमदार अँड. वामनराव चटप यांचे हस्ते होणार आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व महिला व पुरुष कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहून रक्तदान करणार आहेत.