गौरी विसर्जना दरम्यान नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 15 वर्षीय मुलाचे शव आढळले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गौरी विसर्जना दरम्यान नाल्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 15 वर्षीय मुलाचे शव आढळले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर ;

सावली तालुक्यातील अंतरगाव येथे काल दि 2 ला गौरी विसर्जन दरम्यान खुशाल बंडू करकाडे 15 वर्ष हा पोहण्यासाठी नाल्यात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती.


सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच गावातील लोक घटना स्थळी धाऊन आले. दरम्यान वाहून जाणाऱ्या मुलास शेखर भोयर यानी पाण्यात उडी घेऊन वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पर्यन्त अयशस्वी ठरला. 

नंतर गावकऱ्यांनी नाल्याच्या परिसर पिंजून काढला. परंतु काही हाती न लागल्याने जिल्हा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सदर पथकाने घटना स्थळापासून 5 ते 6 किमी पर्यंत सायंकाळी 6 वाजे पर्यंत शोध मोहीम राबविली. पण वाहून गेलेला मुलगा मिळून आला नाही.

काल दि. 3 रोजी स्थानिक भोई समाजाच्या लोकांनी आपले कौशल्य वापरून जाळ्याच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली. त्या दरम्यान वाहून गेलेल्या मुलाचे शव आढळून आले. गावातील मुलाच्या दुर्दैवी म्रुत्युने गावात शोक कळा पसरली आहे. पुढील तपास पाथरी पोलीस करीत असून शव उत्तरीय तपासणी साठी पाठविले आहे.