महायुतीच ठरलं : शिवसेना 110 : भाजपा 160 : मित्रपक्ष 18 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महायुतीच ठरलं : शिवसेना 110 : भाजपा 160 : मित्रपक्ष 18

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र -मुंबई :

महायुतीच्या शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक यशस्वी ठरली असून त्यात कोणी किती जागा लढवायच्या याचा फार्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना अगोदर पासून 50-50 टक्के जागा विभागून घ्याव्यात अशा मागणीवर अडून होती. मात्र, मित्र पक्षांना जागा देऊन उरलेल्या जागा 50-50 टक्के वाटून घेऊ अशी भाजपाची भूमिका होती. 

त्यात भाजपामध्ये इनकमिंग खूप होत असल्याने ते पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचा नारा देतात की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा अतिशय शांतपणे सोडविला असून कमी जागांवर लढण्यास त्यांनी शिवसेनेला मनविण्यास ते यशस्वी ठरले आहेत.

शिवसेना आपल्या 63 जागांसह एकूण 110 जागा लढविणार आहे. तर भाजपा आपल्या विद्यमान 113 जागांसह 160 जागी लढणार आहे. या दोन्ही पक्षात झालेल्या इनकमिंगमुळे काही जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी आमदार या पक्षांमध्ये आले पण त्यांचा मतदारसंघ हा दुसऱ्या पक्षाच्या वाटेला आहे. अशा काही मतदारसंघामध्ये अदला बदल करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.