राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी मतदार निर्णायक भूमिकेत : 1लाखाच्या वर मतदार संख्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधानसभा क्षेत्रात आदिवासी मतदार निर्णायक भूमिकेत : 1लाखाच्या वर मतदार संख्या

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा विधानसभा -

निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजला नसला तरीही अनेक उमेदवारांची आपापल्या उमेदवारीकरिता प्रचंड घोडदौड सुरु असून मतदारांना आपल्या बाजूने उभे करण्याच्या कसरती-कवायतीही सुरु आहेत. 

भोगोलिक दृष्ट्या विस्तृत असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रातही अपेक्षित उमेदवारांणीही आपापला जनसंपर्क वाढविला असून अनेक जातीयवादी समीकरणांची जुळवा जुळव सुद्धा सुरु असून  कुणबी पट्टा म्हणून ओळख असलेल्या या क्षेत्रातील बहुतांशी भाग हा नक्षलग्रस्त, डोंगराळ व आदिवासी बहुल (गोंड, प्रधान, कोलाम व नव्याने सामाविस्ट गोंडगोवारी) असून, या  समाजाचीही मतदार संख्या लक्षणीय आहे. 2011च्या अनुसूचित जाती व जमाती गणने प्रमाणे तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

🔷 गोंडपिपरी :
1)अनुसूचित जाती =13,501
 2)अनुसूचित जमाती = 13,811
3)सर्वसाधारण (open+obc) =50,166
एकूण =78,378

 🔷 कोरपना :
1)अनुसूचित जाती =13,825
2)अनुसूचित जमाती = 29,652
 3)सर्वसाधारण  =90,140 
एकूण = 1,33,617

 🔷 जिवती :
1)अनुसूचित जाती =12,500 
2)अनुसूचित जमाती = 17,988 
3)सर्वसाधारण =33,923 
एकूण = 64,411

🔷 राजुरा :
1)अनुसूचित जाती =22388  
2)अनुसूचित जमाती = 26608
3)सर्वसाधारण= 97753 
एकूण =1,46,749

अशी संपूर्ण 4तालुक्यांची एकत्रित मतदार आकडेवारी (गणना 2011नुसार ):
1)अनुसूचित जाती =62,214  
2)अनुसूचित जमाती = 88,059
 3)सर्वसाधारण = 2,72,882 
एकूण = 4,03,115 

2019लोकसभा निवडणूक यादीनुसार संपूर्ण विधानसभा क्षेत्रात 1,02,890आदिवासी मतदार समाविष्ट होते त्यानंतर  विधानसभेकरिता नवमतदारांची नोंदणी नंतर आदिवासी मतदान संख्या अंदाजे 1,09,000च्या घरात आहे.

जिवती, राजुरा, कोरपना  तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना आदिवासी उपजोजना क्षेत्र -1976 लागू असून 1996च्या तत्कालीन  राष्ट्रपतींनी 24 डिसेंबर 1996 च्या, पेसा कायदा अंतर्गत आरक्षित आहेत. सोबतच गोंडपिपरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मिनी माडा (Mini MADA) या  आदिवासी सुधारित लघुक्षेत्र विकास खंडात मोडतात.

ही संपूर्ण आकडेवारी बघता राजुरा विधानसभा क्षेत्र हे आदिवासी समाजच्या विकासउद्देशाने  अनुसूचित जमाती करिता आरक्षित करण्यात यावे अशी मागणी आदिवासी समाजातील नेत्यांनी 12 फेब्रुवारी 2019 ला माननीय राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

या क्षेत्रातील बहुतांशी आदिवासी मतदार हा काँग्रेस चे  वरिष्ठ  दिवंगत नेते व माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांच्या गटात गेले कित्येक वर्ष जुडून होता.परंतु मधल्या कळत वामनराव चटपांची झंणझावात आल्यानंतर काही गोंड पाटीलंनी त्यांना साथ देणे पसंत केले. 

त्यानंतर निमकरांच्या काँग्रेस सोडचिट्टी ने काही काँग्रेसवासी पाटील राष्ट्रवादी कडेही वळले व आता बहुतांशी समाज सत्ताधारी भाजपाचेही समर्थन करताना आढळतो. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार संख्या असलेला हा समाज सर्वच पक्षात विखुरलेला असून त्यांची स्वतंत्र गोंडवाना पार्टीला सुद्धा समर्थन करतात. 

परंतु राजुरा येथील एका घटनेच्या समर्थनात ज्या प्रकारे हा समाज एकवटला व 18एप्रिल 2019 च्या राजुरा शहरात झालेल्या आक्रोश मोर्चत सर्व पक्षीय आदिवासी समाज एकवटून अंदाजे 35000लोकांनी प्रदर्शने केली त्यानंतर समाजातील अनेक पुढारी नेत्यांनी आता एकमत केले असून आमच्या समजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी काही राजकीय पक्षांना मुलाखती देऊन केली आहे. 

काँग्रेस चे जिल्हा परिषद सदस्य गोदरु पाटील जुमनाके यांनी आगामी विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांना सर्व पक्षीय आदिवासी नेत्यांची साथ लाभत असल्याने आपण बंडखोरी करु पण अपक्ष तरी लढऊच अशी भूमिका घेतली असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

त्यामुळे राजुरा क्षेत्रातून विधानसभेवर  कोन जाणार याकरिता आदिवासी मतदार निर्णायक भूमिकेत असतील