ब्रेकिंग न्यूज : अवैध रेती तस्करी करणाऱ्या हायवा वाहनाने उडविले : 1 जागीच ठार तर 2जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : अवैध रेती तस्करी करणाऱ्या हायवा वाहनाने उडविले : 1 जागीच ठार तर 2जखमी

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील टोकावरील पोलीस ठाणे अंतर्गत विरुर स्टे. वरुन एक किलामिटर वर धानोरा या गावाजवळ रोड वर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाने रस्ताच्या कडेला वेगात गाडी पालटविल्याने एकाचा मृत्यू तर दोन इसम जखमी झाल्याची घटना आज दिनांक 17सप्टेंबर रोजी दुपारी 1:30वाजता च्या आसपास घडली.

अवैध रित्या रेती घेऊन जाणाऱ्या हायवा ट्रक ने रस्त्याचे बाजूस आपली दुचाकी उभी करून  लघुशंका करणाऱ्या युवकास उडविलेया मृतकाचे नाव कुणाल देवगडे असून गोंडपीपरी तालुक्यातील वेजगाव चा रहिवासी असल्याचे आधार कार्ड त्याच्या खिश्यात आढळले. 

दोन दिवसापूर्वीच याच पोलीस ठाणे अंतर्गत अवैध तांदूळ तस्करी करणारे वाहन उलटून मूर्ती येतील वृद्धाचा मृत्यू झाला होता हे विषेश.