आदर्श शाळेत क्रीडा दिन उत्साहात साजरा : विध्यार्थीनी घेतली शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ व विविध खेळांचे केले आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत क्रीडा दिन उत्साहात साजरा : विध्यार्थीनी घेतली शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ व विविध खेळांचे केले आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - राजुरा 
बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल यांच्या संयुक्त वीद्यमानाने क्रीडा दिन चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्तीत विध्यार्थी तसेच शिक्षकांनी शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथि म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे , राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, स्कॉऊट यूनिट लिडर रुपेश चिड़े, गाईड यूनिट लिडर सुनीता कोरडे ,आरोग्य शिक्षक नवनाथ बुटले ,क्रीडा शिक्षक प्रशांत रागिट आदिंचि प्रामुख्याने उपस्थिति होती. 


सर्वप्रथम भारतीय हॉकिचे नामांकित खेळाडु मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले." Fit India Movement" या कार्यक्रमाची माहिती जांभूळकर यांनी दिली. समाजातील प्रत्येक नागरिकांनी शारीरिक व्यायाम करावा अथवा खेळांमध्ये भाग घ्यावा व प्रक्रुती स्वास्थ्य राखावे यासाठी केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशांमध्ये Fit India Movement राबविली जात आहे त्यात आपणही सहभागी होऊन सुप्त गुणांना दाखवन्याची संधी या नीमीत्याने विध्यार्थीना मिळाली असे प्रतिपादन बादल बेले यांनी केले. 

यानीमीत्याने विध्यार्थीच्या विविध क्रीडा स्पर्धा व त्यांची प्रात्यक्षिक आणि माहिती देण्यात आली. रस्सीखेच, भालाफेक , हॉकी , गोळाफेक , धावंनी , स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राष्ट्रीय हरित सेना , महाराष्ट्र राज्य भारत स्कॉउट आणि गाईड च्या विध्यार्थी तसेच शिक्षक -शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.


Sharead We Hosting Service -One's website is placed on the same server as many other sites, ranging from a few sites to hundreds of websites. Typically, all domains may share a common pool of server resources, such as RAM and the CPU. The features available with this type of service can be quite basic and not flexible in terms of software and updates. Resellers often sell shared web hosting and web companies often have reseller accounts to provide hosting for clients.