विदर्भ महाविद्यालया तर्फे " एक हात मदतीचा "उपक्रम संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विदर्भ महाविद्यालया तर्फे " एक हात मदतीचा "उपक्रम संपन्न

Share This
खबरकट्टा /संतोष इंद्राळे - जिवती : 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला महापुराने वेढले होते,आभाळ फाटले अन अनेक संसार वाहून गेले या जलप्रलयाने हजारो कुटुंबियांच्या डोक्यावरचे छत हिरावले गेले,त्यांना आवश्यक असणाऱ्या दैनंदिन गोष्टीसाठी तसेच पुरग्रस्तांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी विदर्भ महाविद्यालया तर्फे " एक हात मदतीचा "या उपक्रमाचे आयोजन आज दि.23/08/2019 ला करण्यात आले.


यामध्ये महाविद्यालया तर्फे गावात प्रभात फेरी काढुन जिवती शहरातील नागरिकांना पूरग्रस्त भागातील लोकांसाठी मदतीचे आवाहन विध्यार्थ्यांनी केले.

या उपक्रमासाठी जिवतीच्या नागरिकांनी सर्व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला,या मध्ये काही नगदी रक्कम,अन्नधान्य,कपडे, प्राप्त झाले, या  उपक्रमाला महाविद्यालयातील मा.प्रा.राऊत सर,मा.प्रा.लांडगे सर,मा.प्रा.देशमुख सर, मा.प्रा.पानघाटे सर,मा.प्रा.तेलंग सर,व समस्त महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते,व या उपक्रमासाठी जिवती वासियांचे चांगले सहकार्य लाभले या साठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.