वेकोलि कर्मचाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या : अद्याप मुतदेह शोधण्यात अपयश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोलि कर्मचाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या : अद्याप मुतदेह शोधण्यात अपयश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

बल्लारपूर वेकोलि येथे कार्यरत वेकोलि कर्मचारी श्री वसंत लांबट, वय 52 यांनी काल कार्यालयात हजर असताना अचानक सास्ती- बल्लारपूर ला जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

   

दुपारी 01:25वाजता अनेक प्रत्यदर्शीनी त्यांना प्रत्यक्ष उडी घेताना बघितल्याने घटना राजुरा बल्लारपूर परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

सदर मोजा-मौका राजुरा पोलीस स्थानक हद्दीत येत असल्यामुळे तात्काळ राजुरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व गोतमारांनी नदी पात्रता शोधकार्य सुरु आहे.

लांबट हे मागील आठवड्यात घुगुस पोलीस ठाणे अंतर्गत ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सापडले होते त्याचा त्यांना मानसिक धक्का पोहोचला होता असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.