नगर पंचायत जिवती येथे स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नगर पंचायत जिवती येथे स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : संतोष इंद्राळे जिवती :

आपण जसजशी भौतिक प्रगती करतो ,तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढत आणि पर्यायाने निर्माण केलेल्या कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढतात.पण तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो.त्यामुळे कचऱ्याची समस्या निकाली काढली गेली पाहिजे म्हणून दि.21/08/2019 ला नगर पंचायत जीवतीच्या कार्यालयात स्वच्छ सर्वेक्षण 2020 करिता कार्यशाळा घेण्यात आली.

यामध्ये सफाई कामगारांना हॅन्ड गब्ज,मास्क,आणि जॅकेट, बूट इत्यादी साहित्य देऊन त्यांचा सत्कार कऱण्यात आला,या कार्यशाळेत सफाई कामगारांना कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व नियोजन कसे करावे,या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले,व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून आपली निगा चांगली कशी राखता येईल यासाठी सफाई कामगारांना प्रोत्साहित करण्यात आले.

सदर कार्यशाळेला न.पं.जिवती नगराअध्यक्षा सौ.पुष्पाताई सोयम ,मा.अशपाक शेख उपाध्यक्ष,मा.अमर राठोड गटनेता ,निलेश पाटील संगणक चालक,तसेच नगर पंचायतिचे जीवतीचे सर्व कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते