शेतकऱ्यांना मारझोड करणाऱ्या वनअधिकारी व वनकर्मचारांवर अट्रोसिटी अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल करा :- राजु झोडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांना मारझोड करणाऱ्या वनअधिकारी व वनकर्मचारांवर अट्रोसिटी अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल करा :- राजु झोडे

Share This
-वनजमिनी अंतर्गत शेती करणार्या शेतकर्यांनी राजु झपोडे यांच्या नेत्रुत्वात दिले निवेदन
 खबरकट्टा / चंद्रपूर :
   
आदिवासी व गैरआदिवासी शेतकरी मागिल 80 ते 90 वर्षापासुन वनजमीनीवरिल शेती शेतकरी करत असुन वनहक्क कायदा 2006 सुधारीत वनहक्क कायदा 2008 नुसार शेतकर्यांनी जमीनीच्या स्थायी पट्ट्यासाठी मा.तहसिलदार,उपविभागीय अधिकारी,मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेजवळ दावे सादर केले आहे. तसेच सर्व दावे प्रलंबित तसेच न्यायप्रविष्ट  आहेत.

     
त्यानंतरही वनअधिकारी मा.राठोड साहेब व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी द्वेषभावनेने आदिवासी शेतकरी असुनही कायदेशीररित्या शेचजमीनीचे पट्टे न देता याऊलट सर्व शेतकर्यांना शेती करण्यापासुन रोखले जात आहे. 


शेतकर्यांना मारझोड करणे तसेच शेतीच्या साधनांची नुकसान करणे तसेच धमक्या देणे या प्रकारामुळे संपुर्ण शेतकरी भयभीत असुन त्यांना शेतीपासुन वंचित ठेवले जात आहे. 

त्यामुळे अनुसुचीत जाती जमाती कायद्यातंर्गत अन्याय करणार्या वनअधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करुन न्याय मिळवुन द्यावा करिता चिन्ना गेडाम ,मारोती सिडाम आदि चकनिंबाळा,वलनी,वायगाव ,निबांळा या गावातील पिडीत शेतकर्यांनी राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात निवेदन दिले.