गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर -करंजी मार्गांवर असलेल्या पुलावर पाणी चढले : वाहतूक ठप्प - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर -करंजी मार्गांवर असलेल्या पुलावर पाणी चढले : वाहतूक ठप्प

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :गोंडपिपरी 

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाण्याची पातळी वाढली असून गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर -करंजी मार्गांवर असलेल्या पुलावर पाणि चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 


करंजी ते धानापूर तीन किलोमीटर चे अंतर असून, या मार्गांवर बामणी ते गोंडपिपरी च्या महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे जुना पूल तोडून बांधण्यात येत आहे.या नवनिर्मानाधीन पुलाचे काम अपूर्ण आहे व जुन्या पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल मुसळधार पाऊस पडल्याने दरवर्षीच पाण्याखाली येत असतो. आणि सदर अर्धवट बांधकाम पुलामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.